Sunday, April 26, 2009

मराठी साहित्याची दशा

साधारण ३० वर्षावरील कुणालाही विचारा, "तुम्ही मराठी पुस्तके वाचता का? आणी वाचत असाल तर तुमचे आवडते लेखक कोण?" एक तर फार कमी उत्तरे होकारर्थी येतील. आणी आलीच तर त्यातली जास्तीत जास्त आवडते लेखक हे १९९५ पर्यंतच्या काळातील असतील. तीच तीच नावे पु.ल., वपू, श्रीना, कुणी एखादा अरुण साधू यांचे नाव सांगेल. त्यातल्या त्यात तरुण लोक सुहास शिरवळकर यांचे नाव घेतील.माझ्या लहानपणी मुंबई मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलयाचे चांगले जाळे होते. हा १९८० च्या दशकातला काळ. आमच्या जवळच्या शाखेत ही दर महिन्याला नवी पुस्तके नियमीत पणे येत असत. तुमचा विश्वास बसणार नाही,पण ज्या रविवारी नवीन पुस्तके येत, त्या दिवशी आम्ही प्रामुख्याने १० ते २० वयोगटातली मुले मुली, लोकल मध्ये जागा पकडायला लोक धावतात तशी झुंबड उडवून आवडती पुस्तके पहिल्यांदा हस्तगत करायचो.आपल्या पैकी काही जण नियमीत पणे एखाद्या वाचनालयात जात असाल. गेल्या १० वर्षात काय नवीन लेखक आलेच नाहीत काय? आजकाल ची किती नवीन पुस्तके ही ताज्या कथा कादंबर्‍या असतात? मला तरी हल्ली जास्तीत जास्त अनुवादित वा इतरांच्या कामाचा अभ्यास करणारी अथवा फार तर आत्मचरित्र या पलीकडे जास्त काही दिसत नाही. नवीन कुणीही चांगले नाही असे मी म्हणणार नाही, पण चांगले हे अलपसंख्य आहेत.आता काळ बदललाय आणी चित्रही बदललय. याला कारण काय? कुणी म्हणेल याला दूरचित्रवाणी कारणीभूत आहे, पण मला तसे वाटत नाही. १९७० च्या दशकात ही दूरदर्शन सुरू झाले होते आणी जरी इतकी चॅनेल्स नसली तरी कार्यक्रमांचा दर्जा हा आतापेक्षा फारच चांगला होता. आणी त्या काळात ही लोकांना दूरदर्शन ची प्रचंड क्रेज़ होती. मला वाटते या बदलांना कारणीभूत आहे बदललेली सामाजीक परिस्थिती, आणी अशी परिस्थिती बदलत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारांनी त्यांची पार न पाडलेली जबाबदारी.
बदललेली परिस्थिती म्हणजे आपल्या नोकरी धंद्यातल्या कामांचे बदललेले स्वरूप. समाजातला हुशार लोकांचा कल हा प्रामुख्याने अश्या नोकर्‍यात आहे, ज्यात एकतर माणसाचा माणसान्शी संबंध कमी आणि मशीन शी जास्ता येतो, आणी या नोकर्‍या मधला आपला जाणारा दिवसाचा वेळ. आता पूर्वीचे ८ ते ९ तास कामाचे दिवस जवळ जवळ संपले आहेत. आपल्याला हे नव्या स्वरूपाच्या नोकर्‍या दिल्या म्हणजे आपल्याला उपकार केल्या सारखे पिळून काढले जाते. त्या मूळे ८ तासाच्या बदली १० ते १२ तास काम हे कॉमन झाले आहे. मग या कामाचा वाढलेला ताण. त्यातून कुटुंबा साठी राहिलेला कमी वेळ. मग त्यातून उद्भावणारे ताण तणाव. या सार्‍यात चांगले वाचायला किती वेळ आहे आणि कुणाला आहे? वाचायला ही मग लोकांना इन्स्टेंट फुड सारखे काही लागते. म्हणजे चमचमीत मासिके, आणि वर्तमानपत्रे वगैरे. या सार्‍याच्या जोडी ला फास्ट फुड सारखे दूरदर्शन आहेच. या सार्‍या मूळे कुठल्याही उद्योगाला जे मागणी तसा पुरवठा हे ईक्वेशन असते ते इथे तोकडे पडते, कारण मागणी खालावलिये. शिवाय असल्या वातावरणात माणसाची क्रियेटिविटी ही कशी फुलणार?
ही सारी परिस्थिती अशी बदलत असताना, जसे इतर आघाड्यांवर आपली सरकारे मागे पडली तशी याही बाबतीत. सरकारला जसे प्रगती ला हातभार लावण्या साठी त्यानी काय केले पाहिजे हे कळले नाही, तसेच दुर्गति ला रोखण्या साठी काय करावे हेही सुचले नाही. भाषेला जगवायला आणि क्रियेटिविटी ला एक पुश द्यायला फार पैसा लागत नाही पण एक उत्तम "फेसिलिटेटर" ची गरज असते. आपल्या सरकारला मदत म्हणजे कुणाला तरी फुकट अनुदान या पलीकडे काही समजत नाही. असो, सरकारच्या नाकर्ते पाणाची कारण मिमासा हा फार मोठा विषय आहे.
गेल्या १ ते २ वर्षात इंटरनेट वर देवनागरी लिपी खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित झालीए, मुख्यत्वे ब्लॉग्स च्या बाबतीत. ही फार महत्वाची प्रगती आहे मराठी भाषे ला जिवन्त ठेवून वाढवण्या साठी. आजकाल आपल्या कामाच्या ठिकाणी ही वर्कलाइफ बॅलेन्स ला महत्व येऊ लागले आहे, त्या मूळे पाहुया पुढे काय काय होते ते...

2 comments:

Swati said...

mala nahi patat tumache vichar Jogalekar :), not 100%.

We can not hold Government responsible for everything wrong. Manya aahe ki tyana watale tar te badal ghadavu shaktat, jase south chya rajkarnyani prantiya bhashe cha aatahas dharala tyamule tikade jaast pramanat migration pan nahiye.. pan maze kahi tamil friends mhanatat ki "Out govt cheated us" karan tyana outside tamilnadu, survival la tras jaato..
whereas we are quite adaptive. Pan tu je marathi sahitya baddal boltoy te kharay, mala pan kayam waite watat ki mazi mulagi marathi vachanar nahi.. pan baryach anshi aapan , badalata samaj,compitition etc jababdar aahet. Vachay chi aawad lahan panapasun vadhawawi lagate ase mala watat.. aata aapan dhekil kuthe evadhe marathitun lihito... unless ur blogging :)

Marathi mansane swataha jabadari uchlun bhasha tikavali pahije..

Swati said...

hello,

no blogs from you since long....lekhak utha aata....